This is Dhangekar चे पोस्टर कोल्हापुरात लावत काँग्रेसने चंद्रकांत दादांना पुन्हा डिवचल !!!



कोल्हापूर: पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या बालेकिल्लातच सुरुंग लावत विजय मिळवला. रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना धूळ चाखत भाजप आणि त्यांच्या नेत्यांना तोंडावर पाडले. तर या पराभवावरून महाविकास आघाडी कडून भाजप नेत्यांवर जोरदार टीका होत आहे. अशातच सोशल मीडियाच्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हू इज धंगेकर असे म्हणलेले व्हिडिओ व्हायरल होत असून त्याला धिस इज धंगेकर असे प्रत्युत्तर दिले जात आहे. तर अशा प्रकारचे बॅनर संपूर्ण पुण्यात झळकत असून हाच बॅनर आता चंद्रकांत पाटील यांचं होम ग्राउंड असणाऱ्या कोल्हापूर मध्ये देखील झळकत आहे. कोल्हापुरातील कावळा नाका येथील ताराराणी चौकात धिस इज धंगेकर असे लिहिलेले पोस्टर लावण्यात आले असून एक प्रकारे चंद्रकांत पाटील यांना डीवचण्याचे काम काँग्रेसच्या वतीने केला जात आहे.
कोल्हापुरातील ताराराणी चौकात हा पोस्टर लावण्यात आला असून महाविकास आघाडीच्या वतीने येथे जल्लोष देखील करण्यात आला. तसेच यावेळी भाजपचे पुण्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कार्यकर्त्यांनी जोरदार टीका केली आहे. स्वतःला गिरणी कामगारांचा मुलगा म्हणून घेता आणि दुसऱ्याला इतकं कमी लेखता यामुळेच आम्ही हा पोस्टर येथे लावला आहोत आणि 2024 सालच्या निवडणुकीत देखील तुम्हाला कसब्यात जे घडलं त्याचीच पुनरावृत्ती दिसेल असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच काल संजय राऊत यांनी देखील यापुढे भाजपचे सर्व बालेकिल्ले असेच उधळून लावू असे म्हणत पुण्याची हवा आता बदलले आहे यामुळे चंद्रकांत दादा आता तुम्ही कोथरूड मधून निवडणूक लढणार का? असा खोचक सवाल हे त्यांनी यावेळी विचारला होता.

कसब्याची पोटनिवडणूक ही मोठी प्रतिष्ठेची मांडली जात होती यामुळे भाजप आणि शिंदे गटाकडून येथे मोठ्या प्रमाणात प्रचार रोडशो करण्यात आला याचवेळी केंद्रीय मंत्री सुद्धा येथे दाखल झाले तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तर येथे तळ ठेवून उपस्थित होते जागोजागी कॉर्नर सभा मोठ मोठ्या शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली अशाच एका सभेत चंद्रकांत दादांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना हू इज धंगेकर ते आमच्यासमोर टिकू शकत नाहीत असे म्हणत कमी लेखले मात्र महाविकास आघाडी कडून शांततेची भूमिका घेत आपली प्रचार सभा सुरू ठेवली आणि आता विजयानंतर धिस इज धंगेकर अशा आशियाचे बॅनर संपूर्ण पुण्यासह आता कोल्हापुरात देखील लावले जात आहेत.

Post a Comment

0 Comments