सोलापूर:शरद पवार यांनी 2024 मध्ये वारे बदलतील असे वक्तव्य केले आहे.त्यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया देत ,टीका केली आहे.रस्त्यावर पोपट घेऊन भविष्य सांगणारे भरपूर आहेत.शरद पवारांनी पोपट घेऊन बसणाऱ्याच्या रांगेत बसू नये असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे.कसब्याच्या निवडणूक निकालावरून महाविकास आघाडी मध्ये स्वप्नरंजन सुरू आहे.याला मी मुंगेरीलाल के हसीन सपने असे विखे पाटील म्हणाले.
राधाकृष्ण विखे पाटील यांचा तब्बल दीड महिन्यानंतर,सोलापूर दौरा :
राज्यचे महसूलमंत्री व सोलापूर जिल्ह्याकगे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दीड महिन्यानंतर सोलापूर दौऱ्यावर आले होते.स्मार्ट सिटी,सुरत चेन्नई महामार्गावर असलेल्या शेतजमीन भूसंपादन बाबत विखे-पाटील यांनी बैठका घेतल्या.शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन यावेळी विखेपाटील यांनी दिले.
राजकारण करून किंवा स्टंटबाजी करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही :
कांदा उत्पादक शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी काही शेतकऱ्यांना घेऊन सोलापुरातील नियोजन भवन येथे गोंधळ घातला.महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ,यावर प्रतिक्रिया देत माहिती दिली ,शेतकऱ्यांची जाणीव आहे.विधानसभेत देखील यावर चर्चा झाली.शेतकऱ्यांच्या बाबतीत राजकारण करू नये,किंवा स्टंटबाजी करू नये असे विखे पाटील म्हणाले.उद्या सकाळी जनहित शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर देशमुख यांसोबत चर्चा करू असे विखे पाटील यांनी माहिती दिली.
0 Comments