मालगाडीचा डबा घसरल्याने वंदे भारत,हुतात्मा एक्सप्रेस लेट;तीन तास उशिरा पोहोचणार सोलापुरात

सोलापूर:मालगाडीचा डबा घसरल्याने सोलापूर कडे येणाऱ्या रेल्वे प्रवाशी वाहतूकीवर थेट परिणाम झाला आहे.वंदे भारत,हुतात्मा एक्सप्रेस,काकीनाडा एक्सप्रेस या गाड्या तीन तास उशिरा धावत असल्याने सोलापूर स्थानकात उशीरा पोहोचणार असल्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.चिंचवड ते वाडी दरम्यान जाणाऱ्या सामग्री एक्सप्रेसचा डबा दौंड जवळ घसरला.त्यामुळे सोलापूर कडे किंवा दक्षिण भारताकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशी वाहतूक करणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांवर थेट परिणाम झाला आहे.रेल्वे मेकॅनिक विभागाने शर्थीचे प्रयत्न करून सामग्री एक्सप्रेसचा डबा रुळावर आणला असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

• दौंडजवळ सामग्री मालगाडीची एक ट्राली रुळावरून घसरली-

चिंचवड येथून निघालेल्या सामग्री मालगाडीची एक ट्राली रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दौंड जवळ घसरली.यामुळे सोलापूर कडे येणाऱ्या प्रवाशी एक्सप्रेस मेल वाहतूकीवर थेट परिणाम झाला आहे.जवळपास दोन तास मालगाडीचा डबा रेल्वे रुळावर आणण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाने केला.दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सामग्री मालगाडीचा डबा रुळावर आणून दौंड स्थानकाकडे मालगाडी रवाना करण्यात आली.

• वंदे भारत, हुतात्मा एक्सप्रेस,व काकीनाडा एक्सप्रेसला उशीर-

मालगाडीचा डबा घसरल्याने सायंकाळच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकांवरून निघालेल्या प्रवाशी वाहतुकीच्या मेल एक्सप्रेसवर थेट परिणाम झाला आहे.पुणे रेल्वे स्थानकावरून हुतात्मा एक्सप्रेस सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास निघते,तर वंदे भारत एक्सप्रेस सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावरून सोलापूरकडे निघते.याच दरम्यान काकीनाडा एक्सप्रेस देखील पुणे हुन सोलापूर कडे प्रस्थान करते.दौंड जवळ डबा रुळावर आणण्याचे काम सुरू असल्याने हुतात्मा एक्सप्रेस,काकीनाडा एक्सप्रेसला लोणीजवळ थांबा देण्यात आला होता. तर वंदे भारत एक्सप्रेसला पुणे स्थानकावर जागा नसल्याने खडकी रेल्वे स्थनाकावर यायला रात्री 9 वाजले.मुळे वंदे भारत,हुतात्मा एक्सप्रेस जवळपास तीन तास उशिरा सोलापूर स्थनाकावर पोहोचतील,रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सोलापूर रेल्वे स्थानकात दाखल होणाऱ्या या महत्वाच्या मेल एक्सप्रेस रात्री 1 वाजण्याच्या सुमारास दाखल होतील असा अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments