सर्वात आधी कोल्हापुरात महाविकास आघाडी पॅटर्न राबवणारे आ. सतेज बंटी पाटील यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी नियुक्ती

कोल्हापूर: राज्याचे माजी गृहराजयमंत्री व विधान परिषद सदस्य सतेज बंटी पाटिल यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गो-हे यांनी आज सभागृहात त्यांच्या निवडीची घोषणा केली
सतेज बंटी पाटील हे यांनी कोल्हापूर जिल्हयात पक्ष संघटना वाढीस चालना दिली आहे. 2010- 14 च्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. 2019 च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृहराज्य मंत्री, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन अशाविविध विभागांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वप्रथम महाविकास आघाडीचा पॅटर्न राबवणारे सतेज पाटील काँग्रेसचा चेहरा आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक काँग्रेस आमदार निवडून आणण्यामध्ये त्यांचा सर्वाधिक वाटा आहे. तसेच कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्षही आहे राज्यात भाजपची सत्ता असताना ही कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार किंवा खासदार निवडून न येऊ देण्यात आमदार सतेज पाटील यांचा मोठा वाटा आहे. आमचं ठरलंय म्हणत राज्यात महाविकास आघाडी पॅटर्न येण्याअगोदर ते कोल्हापुरात राबवण्यात त्यांना मोठे यश आलं यामुळे चंद्रकांत पाटील यांना देखील त्यांचे मूळ गाव कोल्हापूर सोडून पुण्यातून निवडणूक लढवावी लागली.कोल्हापुरात सतेज पाटील यांच्या निवडणुकीच्या रणनीतीने भाजपला अस्मान दाखवण्याचे काम केल. तर नुकत्याच पार पडलेल्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात सर्वात अधिक गावागावात जाऊन यात्रा थेट प्रक्षेपण दाखवण्याचे कॅम्पेन सतीश पाटील यांनी राबवले यानंतर हे पॅटर्न संपूर्ण राज्यात पोचलं. सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

तर याबाबत आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेस पक्षाचे आभार मानत काँग्रेस पक्षाने आज पर्यंत दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचे आपण प्रयत्न केला आहे आता पक्षाने गटन येथे पदाची जबाबदारी दिली असून या पदाला स्वतःला वाहून घेत न्याय देण्याचा प्रयत्न करू तसेच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला आहे तो पूर्णत्वास घेऊन जाण्यास मी प्रयत्नशील राहील असे म्हणत त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.



Post a Comment

0 Comments