सांगली: जे कसब्यात झालं ते 2024 मध्ये सांगली आणि मिरजेमध्ये होईल. खरी शिवसेना कोणाची त्यासाठी निवडणूक घ्या जनताच ठरवेल इतका दिवस कसब्यात शिवसेनेच्या मदतीने भाजप विजय होत होता ज्यांना तुम्ही पक्ष आणि चिन्ह दिले त्या पक्षाची मते कसब्याच्या निवडणुकीमध्ये का पडले नाहीत याचा त्यांनी विचार करावा तसेच यापुढे चंद्रकांत पाटील कोथरूड मधून निवडणूक लढणार आहेत का? कारण आता पुण्याची हवा बदलली आहे. चंद्रकांतदादा आता टोपी सांभाळा टोपी सांभाळा अशा टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत दादा पाटील यांना लगावला आहे त्यात सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
•किरकोळ प्रकरणात शिवसेना पडत नाही:
दरम्यान आज सकाळी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काही जणांनी हल्ला केला या ते जखमी झाले मात्र हा हल्ला संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी घडवून आणल्याचा आरोप अमेय खोपकर यांनी केला याबाबत संजय राऊत यांनी कोणावर हल्ला झाला मला माहित नाही महाराष्ट्रात असे अनेक ठिकाणी अनेक हल्ले होत असतात गृहमंत्री त्याच्याकडे गांभीर्याने बघत नाहीत आणि अशा किरकोळ प्रकरणात शिवसेना पडत नाही.अनेक वेळा सणसणाटी निर्माण करून लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काही लोक स्वतःवर हल्ले करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र मुंबईत कोणत्या राजकीय नेत्यावर अशाप्रकारे हल्ले होत असेल,तर पोलिसांनी ती बाब गंभीर्यांनी घ्यायला हवी. मात्र अशा हल्ल्यात आमचे नाव घेऊन काय होणार केवळ पेपर मध्ये दोन दिवस बातमी येईल असे म्हणत खोपकरानी केलेल्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे
• नोटीस अद्याप माझ्यापर्यंत अद्याप पोहोचले नाही :
तर विधानसभा समितीकडून संजय राऊत यांना मिळालेल्या नोटीशेला संजय राऊत यांना आज उत्तर देण्याचा शेवटचा दिवस होता अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याने याबाबत त्यांना विचारले असता मला कुठे नोटीस मिळाली आहे नोटीस माझ्या कार्यालयात आली आहे. ती अद्याप माझ्यापर्यंत अद्याप पोहोचले नाही. मी सध्या दौऱ्यात आहे मुंबईत गेल्यावर नोटीस माझ्या हातात आली की कायद्याचा अभ्यास करू आणि मग उत्तर देऊ असे संजय राऊत म्हणाले आहेत.
0 Comments