Shark Tank फेम अशनीर ग्रोव्हर कोल्हापूरात श्री अंबाबाई मंदिरातून फोटो केला शेअर

शार्क टॅंक हा शो प्रेक्षकांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे.शार्क टँकचे आतापर्यंत दोन सीजन आले. दोन्ही सिजनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या दुसऱ्या सीजनमध्ये अशनीर ग्रोव्हर यांना सर्वांनी मिस केलं. परखड, रोखठोक असलेले अशनीर ग्रोव्हर सर्वांना आवडायचे.

त्यांचे स्पष्ट बोलणं लोकांना पटायचं. सध्या अशनीर शार्क टँक मध्ये दिसत नसला तरीही तो सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतता. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतात. अशनिर यांनी नुकतच कोल्हापूरच्या अंबाबाईच दर्शन घेतलं.

यावेळी त्यांची बायको देखील त्यांच्यासोबत होती. अशनीर यांनी बायको माधुरीसोबतचा कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराबाहेरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात.. प्राचीन, अध्यात्मिक आणि शांत करणारं ठिकाण अशा अंदाजात अशनीरने कॅप्शन लिहून बायकोसोबतचा हा खास फोटो शेयर केला आहे.

अशनीर कोल्हापूरला आलेत हे कळताच त्यांच्या फॅन्सनी कमेंट करून त्याचं कोल्हापूरमध्ये कोल्हापूर स्टाईल स्वागत केलं. वेलकम टू कोल्हापूर अशनीर सर.. तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, कोल्हापूर शहरात स्वागत अशनीर सर.., कोल्हापुरी जेवणाचा जरूर आस्वाद घ्या.. तांबडा पांढरा रस्सा जरूर ट्राय करा, अशा शब्दात नेटकऱ्यांनी कमेंट करत अशनीरचं स्वागत केलं आहे.

कोल्हापूरची खाद्य संस्कृती वेगळी आहे. कोल्हापूरी मिसळ, तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापूरी ठेचा, कोल्हापूरी तिखट, दूध आमटी जरभरात प्रसिद्ध आहेत. म्हणून कोल्हापूरात आल्यानंतर सगळे तांबाडा पांढरा रस्सा खाण्याचा सल्ला देतात. खाण्याचा सल्ला म्हणजे कोल्हापूरी भाषेत सांगायचं तर ताव मारण्याचा सल्ला देतात.

अशनीर भारत पेचे संस्थापक आहेत. परंतु भारत पे मधून अशनीर यांना पायउतार व्हावे लागले. दरम्यान शार्क टॅंक इंडियाचा पहिला सीजन अशनीर यांनी गाजवला. दुसऱ्या सीजनमध्ये सर्वजण त्यांना मिस करताना दिसतात.

Post a Comment

0 Comments