आमचं ठरलय जुनी पेन्शन म्हणत सतेज पाटील यांच्या नेतृत्वात जुन्या पेन्शन साठी भव्य मोर्चा


कोल्हापूर: एकच मिशन जुनी पेन्शन आमचं ठरलंय जुनी पेन्शन उरलय अशा घोषणा देत आणि विविध आशयाचे फलक हाती घेऊन हजारो सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांनी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात रस्त्यावर उतरले तसेच जुनी पेन्शनची मागणी मान्य होईपर्यंत लढा चालूच राहील असा इशाराही यावेळी सरकारला देण्यात आला. दुपारी 12 वाजता शिवाजी पेठेतील महात्मा गांधी मैदान येथून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर चौदा मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
•मोठ्या संख्येने कर्मचारी रस्त्यावर: 

जुनी पेन्शन लागू करा या मागणीसाठी कोल्हापूरात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.तर या मोर्चाचे नेतृत्व आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले. हा मोर्चा गांधी मैदानावरून बिनखांबी गणेश मंदिर मार्गे महाद्वाररोड, पापाची तिकटी, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर वरून जिल्हाधिकारी कार्यालय येऊन धडकला. विद्यमान सरकारने ही पेन्शन योजना लागू करावी एवढीच आपली अपेक्षा आणि मागणी असणार आहे असे आमदार सतेज पाटील यांनी म्हंटले असून या मोर्चा मध्ये सरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रत्येक वेळी सरकारकडून आश्वासन दिले जाते. मात्र कोणताच ठाम निर्णय आजपर्यंत झाला नाहीये. त्यामुळे आता आम्ही मागे हटणार नाही असे कर्मचाऱ्यांनी म्हंटले आहे तर मागणी संदर्भात सरकारने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास यापुढच्या काळात हे आंदोलन आणखी तीव्र स्वरूपाचे असे कर्मचान्यांनी म्हंटले आहे.
• देशातील चार राज्यांनी निर्णय जाहीर केला महाराष्ट्राने ही करावी: 

तर जुनी पेंशन योजनेबाबत देशातील चार राज्यांनी निर्णय जाहीर केला आहे. आता महाराष्ट्र सरकारने सुद्धा ही जुनी पेंशन योजना लागू करावी. महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशा देत आला आहे. यापुढच्या काळात सुद्धा सरकारकडून हीच अपेक्षा आहे असेही सतेज पाटील म्हणाले आहेत.ही कर्मचाऱ्यांची मागणी असून यामध्ये कोणताही राजकीय स्वार्थ नाही म्हणून ती मान्य व्हावी अशी आमची अपेक्षा असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.शिवाय हा प्रश्न अशाच पद्धतीने पुढच्या काळात उचलून धरू असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी सरकारला दिला.



Post a Comment

0 Comments