अमरावती :राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून यावेळी m स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कांदे फेकण्याचा प्रयत्न जोरदार घोषणाबाजी केली असून पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व आंदोलकांना अटक करण्यात आली.
अमरावती शहरातील सायन्स कोर्स मैदानात मागील एक तारखेपासून मिलेट्स कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आज या महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम पार पडला यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, भाजप शिक्षक सेलच्या संगीता शिंदे, नितीन गुडदे, आमदार प्रवीण पोटे, आमदार प्रताप अडसड यावेळी उपस्थित होते. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी महोत्सवाकडे निघाले असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यावर कांदे फेकण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या दक्षतेमुळे तो प्रयत्न विफल ठरला.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांचा निषेध असो ,अतिवृष्टी चे पैसे मिळाले पाहिजे, कांदा सोयाबीन व कापसाला भाव ,देण्याची मागणी करीत शिंदे -फडणवीस सरकारचा निषेध असो म्हणत घोषणाबाजी सुरू केली मात्र कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दोन दिवसापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने सरकारचा निषेध नोंदवत गोपनीय पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून शिवसेना नेते सागर देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चहुबाजूने पोलिस यंत्रणा असताना युवा सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा घेतल्याने आज पोलीस अधिक सक्रिय होते.कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता अमरावती पोलिसांच्या वतीने कडक बंदोबस्त लावण्यात आला होता येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक स्त्री-पुरुषांच्या हाती असलेली बॅग पाण्याची वॉटर बॅग व स्ट्रॉबेरी चे कॅरेट सुद्धा अत्यंत बारकाईने तपासण्यात आले होते.
0 Comments